Contact Banner

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ‘इंडक्शन सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ

 

godavari-imr-college-induction-week-2026-inauguration-jalgaon

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ‘इंडक्शन सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ




लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव येथे नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. बीसीए, एमसीए आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सिलिकॉन व्हॅली, टेक्सस तसेच विविध आयटी हब आणि कॉर्पोरेट क्षेत्रात भारतीय मनुष्यबळाचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती देत व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

‘मॅनेजमेंट आणि योग्य निर्णयक्षमता ही यशाची गुरुकिल्ली’

व्यवस्थापन क्षेत्रात निर्णयक्षमता किती महत्त्वाची आहे, याबाबत डॉ. वारके यांनी विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला. भविष्यातील करिअरसाठी केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून प्लेसमेंटच्या दृष्टीने सॉफ्ट स्किल्स, संवादकौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

गोदावरी आयएमआरमधून आजवर १७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली असून संस्थेत अद्ययावत संशोधन केंद्र उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक व संशोधन सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. प्रशांत वारके यांनी गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची व संस्थेच्या वाटचालीची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना दिली. इंडक्शन सप्ताहाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, अभ्यासक्रम, करिअरच्या संधी तसेच व्यावसायिक क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांची ओळख करून देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.