Contact Banner

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक

 

godavari-team-apex-innovators-business-plan-competition-third-prize-jalgaon

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक

‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक; युवा नवोन्मेषकांच्या कल्पनांना मिळाले व्यासपीठ





जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ने ‘द नेक्स्ट बिलियन – बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’मध्ये तृतीय क्रमांक पटकावत २ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.

‘युवायव्होल्यूशन युवा संमेलन – युवा भारत : वारशापासून नेतृत्वापर्यंत’ या उपक्रमांतर्गत ६ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवा नवोन्मेषक व उद्योजकांना आपल्या कल्पना मांडण्यासोबतच व्यावसायिक कौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन सादर करण्यासाठी या स्पर्धेत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.

‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील प्रतीक वारके, शेख अल्तमाश, गौरव इंगळे आणि जिज्ञासा पाटील यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे आपली व्यावसायिक संकल्पना सादर करताना नाविन्यपूर्ण विचार, टीमवर्क, उद्योजकीय दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले.

या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रासोबतच नवोपक्रम आणि उद्योजकता क्षेत्रातील उपक्रमांना आणखी बळ मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.