Contact Banner

१२ वर्षांपासून प्रलंबित लेवा समाजाच्या हॉलच्या हस्तांतरणाचा मुद्दा ऐरणीवर पुढील नगरपरिषद सभेत ठोस निर्णय घेण्याची गटनेता रंजना भारंबेंची मागणी

 

lewa-samaj-hall-transfer-ranjana-bharambe-demand-savda

१२ वर्षांपासून प्रलंबित लेवा समाजाच्या हॉलच्या हस्तांतरणाचा मुद्दा ऐरणीवर

पुढील नगरपरिषद सभेत ठोस निर्णय घेण्याची गटनेता रंजना भारंबेंची मागणी.
lewa-samaj-hall-transfer-ranjana-bharambe-demand-savda
 येथे जाहिरात प्रसिद्धी करायची असल्यास संपर्क साधा -लेवा जगत न्यूज 8983689844

लेवाजगत न्यूज सावदा : लेवा समाजाच्या नावाने जागा आरक्षित करून उभारण्यात आलेल्या प्रभाकर बुला महाजन सभागृहाचे अधिकृत हस्तांतरण लेवा समाजाकडे करण्याचा विषय आगामी सर्वसाधारण सभेत घेण्यात यावा, अशी मागणी भाजपा-शिवसेना गटाच्या गटनेता तथा नगरसेविका रंजना ताई जितेंद्र भारंबे यांनी नगरपरिषद सभागृहात केली.

नगरपरिषदेच्या बाबुशेठ हॉलसमोरील गट नं. ६४९/६५० मधील २० गुंठे जागा लेवा समाजासाठी देण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यानंतर सदर जागा लेवा समाजाच्या हॉलसाठी आरक्षित करण्याचा ठरावही करण्यात आला. पुढे हॉलचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तो लेवा समाजाकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्याची कार्यवाही अपेक्षित होती. मात्र, हॉल पूर्ण होऊन तब्बल १२ वर्षांचा कालावधी उलटूनही हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा मुद्दा आता समोर आला आहे.

ठराव झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी का झाली नाही? लेवा समाजाच्या मागणीला इतकी वर्षे न्याय का मिळाला नाही? प्रशासनाकडून हस्तांतरणासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली आणि नेमका अडथळा कोणता आहे, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी रंजना भारंबे यांनी केली.

दरम्यान, सकल लेवा पाटील समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रभाकर बुला महाजन सभागृह समाजाकडे अधिकृतपणे हस्तांतरित करून मिळावे, यासाठी नगरपरिषदेकडे अर्ज करण्यात आला आहे. या मागणीची दखल घेत रंजना भारंबे यांनी आगामी सर्वसाधारण सभेत हा विषय घेऊन लेवा समाजाला न्याय देण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली.

“केवळ ठराव करून विषय प्रलंबित ठेवण्याऐवजी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. पुढील सभेत सभागृह हस्तांतरणाचा ठोस विषय घेण्यात यावा,” अशी भूमिका गटनेता रंजना भारंबे यांनी मांडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.