Contact Banner

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा २७ सप्टेंबरला

 

jalgaon-godavari-karandak-state-level-bhavgeet-competition-27-september-2026

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम; राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा २७ सप्टेंबरला


jalgaon-godavari-karandak-state-level-bhavgeet-competition-27-september-2026
 लेवा जगत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास संपर्क साधा -8983689844


लेवाजगत न्यूज जळगाव : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गोदावरी करंडक’ राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. स्पर्धेचे यंदाचे २९ वे वर्ष असून, रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून, अनेक गायक-कलाकारांना या स्पर्धेने संधी मिळाली आहे. यंदाही राज्यभरातून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

स्पर्धा बाल गट, किशोर गट आणि प्रौढ गट अशा तीन गटांत होणार आहे. बाल गटात इयत्ता १ ली ते ६ वी, किशोर गटात इयत्ता ७ वी ते १२ वी, तर प्रौढ गटात ४० वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात.

प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. प्रौढ गटात प्रथम २,००१ रुपये, द्वितीय १,५०१ रुपये व तृतीय १,००१ रुपये; किशोर गटात प्रथम १,५०१ रुपये, द्वितीय १,००१ रुपये व तृतीय ७०१ रुपये; तर बाल गटात प्रथम १,००१ रुपये, द्वितीय ७०१ रुपये व तृतीय ५०१ रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके व प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत.

स्पर्धेला २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. किशोर व प्रौढ गटासाठी मराठी चित्रपटांतील भावगीते व गझल सादर करता येतील. बाल गटासाठी बालगीते व भावगीते ग्राह्य धरली जातील.

ही स्पर्धा केवळ हौशी कलाकारांसाठी असून व्यावसायिक तसेच आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकारांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एक गीत सादर करता येईल आणि गीताचे जास्तीत जास्त दोन अंतरे सादर करण्याची परवानगी असेल.

इच्छुक स्पर्धकांनी प्रवेश अर्जाची झेरॉक्स प्रत सादर करावी, असे आयोजकांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय, गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केटजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा.

संपर्क : ९८५०० ७५६५१, ९९२१९९ ६९७४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.