Contact Banner

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू दर्शनावरून परतताना ६४ वर्षीय दगडू ओंकार पाटील यांची प्राणज्योत मालवली; हरिद्वार येथे बुधवारी अंत्यसंस्कार

 

kingaon-char-dham-yatra-dagadu-patil-yamunotri-heart-attack-death-haridwar-funeral

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

दर्शनावरून परतताना ६४ वर्षीय दगडू ओंकार पाटील यांची प्राणज्योत मालवली; हरिद्वार येथे बुधवारी अंत्यसंस्कार


kingaon-char-dham-yatra-dagadu-patil-yamunotri-heart-attack-death-haridwar-funeral


लेवाजगत न्यूज यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या जत्थ्यातील ६४ वर्षीय दगडू ओंकार पाटील यांचे यमुनोत्री येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी (२८ सप्टेंबर) दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना ही घटना घडली. त्यांच्यावर बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दगडू ओंकार पाटील हे पत्नी विठाबाई पाटील तसेच किनगाव बुद्रुक येथील सुमारे २२ भाविकांसोबत २४ सप्टेंबर रोजी चारधाम यात्रेसाठी रवाना झाले होते. २६ सप्टेंबर रोजी हे पथक हरिद्वार येथे पोहोचले. त्यानंतर विविध तीर्थस्थळांचे दर्शन घेत २८ सप्टेंबर रोजी यमुनोत्री येथे दर्शनासाठी गेले होते.

यमुनोत्रीचे दर्शन घेतल्यानंतर भाविक परतीच्या मार्गाला लागले असता दगडू पाटील यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. सहकारी भाविकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली.

पाटील कुटुंबीयांनी हरिद्वार या तीर्थक्षेत्रातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

मुलगा नेदरलँड्सहून हरिद्वारकडे रवाना

दगडू पाटील यांचा मोठा मुलगा किरण पाटील हे नेदरलँड्स येथे वास्तव्यास आहेत. वडिलांच्या निधनाची माहिती मिळताच ते तातडीने रवाना झाले असून लंडनमार्गे दिल्ली येथे दाखल झाले आहेत. बुधवारी ते पत्नी व दोन मुलांसह हरिद्वार येथे पोहोचल्यानंतर अंत्यविधी होणार आहे.

त्यांचा धाकटा मुलगा चेतन पाटील हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तेही कुटुंबीयांसह हरिद्वारकडे रवाना झाले आहेत. या घटनेमुळे किनगाव बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.