नंदकिशोर महाजन यांचा उदळी खु., उदळी बु. व लुमखेडा येथे जिव्हाळ्याने सत्कार
नंदकिशोर महाजन यांचा उदळी खु., उदळी बु. व लुमखेडा येथे जिव्हाळ्याने सत्कार
लेवाजगत उदळी खु. ता. रावेर : विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल नंदकिशोर महाजन यांचा उदळी खुर्द, उदळी बुद्रुक व लुमखेडा या तिन्ही गावांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात जिव्हाळ्याने सत्कार करण्यात आला.
यावेळी तिन्ही गावांतील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने नंदकिशोर महाजन यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामस्थांनी प्रेम, आपुलकी आणि विश्वासाने केलेला हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी असल्याचे नंदकिशोर महाजन यांनी यावेळी सांगितले. जनतेने दिलेला विश्वास हीच आपली खरी ताकद असून, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची जबाबदारी आता आणखी वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले.
गावागावातील मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यांसह शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल. ‘जनसेवा हीच माझी प्राथमिकता’ या भावनेतून सदैव कार्यरत राहण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सत्कार सोहळ्याला आपुलकीचे आणि उत्साहाचे वातावरण लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत