Contact Banner

नशिराबाद येथे ‘श्री गणेशा आरोग्य अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद १२५ नागरिकांची मोफत बीपी-शुगर तपासणी; तिघांना उच्च रक्तदाबाचे निदान

 

nashirabad-shri-ganesha-arogya-abhiyan-free-health-checkup

नशिराबाद येथे ‘श्री गणेशा आरोग्य अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

१२५ नागरिकांची मोफत बीपी-शुगर तपासणी; तिघांना उच्च रक्तदाबाचे निदान

नशिराबाद (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या सूचनेनुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान आरोग्य मंदिर, नशिराबाद अंतर्गत विशेष आरोग्य शिबिर व ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात राबविण्यात आले.

नशिराबाद येथील ‘उंच आड गणेश मंडळा’च्या ठिकाणी आयोजित या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः ३० वर्षांवरील नागरिकांची बिगर-संसर्गजन्य आजार (NCD) अंतर्गत मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी १२५ नागरिकांची रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले.

याशिवाय किरकोळ आजारांच्या रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. आरोग्य तपासणीसोबतच नागरिकांना नियमित योगासने, संतुलित व राष्ट्रीय पोषण आहाराचे महत्त्व तसेच सध्याच्या ऋतूमध्ये पसरणाऱ्या जलजन्य व कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि आवश्यक काळजी याबाबतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी माहिती दिली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते, डॉ. अमन पटेल, आरोग्य सेविका श्रीमती बफी साळुंके, आरोग्य सेवक श्री. सुनील गोविंद ढाके, आशासेविका सुवर्णा पाटील व अरुणा पाटील, मदतनीस शुभदा जैन तसेच १०२ रुग्णवाहिकेचे चालक श्री. राजेंद्र पाचपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री. मनोज चंद्रकांत पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी केशव खुशाल पाटील, विनोद चंद्रकांत पाटील, योगेश रमेश माळी तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.