Contact Banner

पितृपक्षात ‘स्वामी’ संस्थेचा सेवासंकल्प; ८५० कॅन्सरग्रस्त रुग्णांना शिधावाटप

 

pitru-paksha-swamee-850-cancer-patients-ration-distribution-2026

पितृपक्षात ‘स्वामी’ संस्थेचा सेवासंकल्प; ८५० कॅन्सरग्रस्त रुग्णांना शिधावाटप

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पितृपक्षाच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नधान्याचा आधार मिळावा, या उद्देशाने सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन ॲण्ड एन्वायर्नमेंट अर्थात ‘स्वामी’ (SWAMEE) संस्थेच्या वतीने यंदाही शिधावाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गेल्या २१ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या सेवाकार्यात यंदा ८५० कॅन्सरग्रस्त रुग्णांना शिधा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

यंदाचा पितृपक्ष रविवार, २७ सप्टेंबर ते शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आहे. या काळात दररोज ५० रुग्णांना, तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी १५० रुग्णांना शिधावाटप करण्यात येणार आहे.

प्रत्येक रुग्णाला ३ किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, पाव किलो खजूर, अर्धा किलो रवा, १०० ग्रॅम चहा पावडर, अर्धा किलो साखर, बिस्किटांचा पुडा आणि राजगिऱ्याची चिक्की देण्यात येणार आहे. या शिधा संचासाठी प्रत्येक रुग्णामागे अंदाजे ५०० रुपये खर्च अपेक्षित आहे.

सेवाकार्यात सहभागी होण्याचे आवाहन

या उपक्रमासाठी नागरिकांनी आर्थिक अथवा वस्तुरूप देणगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन ‘स्वामी’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देणगीदारांना संबंधित तिथीला स्वतः उपस्थित राहून अन्नदान करता येणार आहे.

‘स्वामी’ संस्थेचे कार्यालय परळ, मुंबई येथे असून कार्यालयीन वेळ सकाळी १० ते १२.३० आणि सायंकाळी ६ ते ८ अशी आहे. संस्थेच्या वतीने दर शनिवारी ‘मातृभाव’ अंतर्गत धान्यवाटपही केले जाते.

देणगीसाठी बँक तपशील :
खाते नाव: SWAMEE Social Workers Association
बँक: Bank of Baroda, Parel Branch
खाते क्रमांक: 99350100001251
IFSC: BARB0DBPARE

संपर्क : 8928061391
ई-मेल : Swamee2016@gmail.com
संकेतस्थळ : www.swamee_ngo.com
फेसबुक : swameengo.com

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या या सेवाकार्यातून कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना अन्नधान्याचा आधार मिळत आहे. देणगीदारांच्या सहकार्याने हा सेवायज्ञ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न ‘स्वामी’ परिवाराकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.