Contact Banner

नूतन प्राथमिक विद्यामंदिर चिनावलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना

 

nutan-primary-school-chinawal-eco-friendly-ganesh-idol-installation

नूतन प्राथमिक विद्यामंदिर चिनावलमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना

चिनावल, ता. रावेर, जि. जळगाव : नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे गणेश चतुर्थीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत यापूर्वी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या शाडू मातीच्या मूर्तीचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथकाच्या सादरीकरणाने झाली. लेझीम पथकाला मार्गदर्शक संतोष आसाराम काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुरेश गिरधर गारसे यांच्या हस्ते गणेश आगमन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. सहदांपत्याच्या उपस्थितीत श्री गणेशाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली.

यावेळी सुनील भास्कर महाजन (अध्यक्ष), राजेंद्र वामन फालक (उपाध्यक्ष), राजेंद्र मुरलीधर पाटील (शालेय समिती सदस्य), किशोर भिवसन बोरोले, विनायक कमलाकर महाजन, दामोदर यादव महाजन, गिरीश पाटील (माजी व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष), गणेश सुभाष बाविस्कर (मुख्याध्यापक, नूतन प्राथमिक विद्यामंदिर), एच. आर. ठाकरे (मुख्याध्यापक, नु. मा. वि.), पर्यवेक्षक प्रमोद जावळे तसेच शिक्षक पंकज वारके, हर्षाली कोल्हे, भावना नेमाडे, कविता पाटील, कविता नेमाडे, सपना टोके, विनिता नारखेडे, मिलिंद गारसे, शिपाई चंद्रकांत लक्ष्मण कुरकुरे, स्वाती भंगाळे, सरला किरंगे, शितल राणे, बँड पथक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून शाळेने ‘पर्यावरण संवर्धन आणि निसर्गपूरक गणेशोत्सव’ हा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश दिला. पारंपरिक श्रद्धेसोबत पर्यावरणाची जपणूक करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, नूतन प्राथमिक विद्यामंदिर चिनावलने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.