Contact Banner

९वी, १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षणाची सुवर्णसंधी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात विविध कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

 

ycmou-krushi-abhyaskram-pravesh-2026-27-dr-ulhas-patil-krushi-mahavidyalaya-jalgaon

९वी, १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षणाची सुवर्णसंधी

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात विविध कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू

लेवाजगत न्यूज जळगाव : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू), नाशिक अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शेती, कृषी व्यवसाय तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या ९वी व १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही विशेष संधी उपलब्ध झाली आहे.

महाविद्यालयात ९वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम, तर १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम (सर्व पदविका प्रथम वर्ष) उपलब्ध आहे. कृषी अधिष्ठान पूर्ण किंवा एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्यानविद्या पदविका (डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर), कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी पत्रकारिता पदविका, फळबाग उत्पादन, भाजीपाला उत्पादन तसेच फुलशेती व प्रांगणउद्यान हे दोन वर्षांचे पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे नोकरी अथवा अन्य शिक्षण सांभाळून विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी शनिवार व रविवार प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देण्यात आला असून, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल शिक्षण सुविधा तसेच प्रशस्त परिसराची सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहे.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार खते, बियाणे व कीटकनाशक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक पात्रता प्राप्त होऊ शकते. तसेच कृषी क्षेत्रातील विविध शासकीय पदांसाठी हे शिक्षण उपयुक्त ठरू शकते. कृषी कंपन्यांमध्ये सेल्स ऑफिसर, सेल्स प्रतिनिधी, फार्म सुपरवायझर, गार्डन सुपरवायझर, साहाय्यक व्यवस्थापक आदी पदांवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय स्वतःचा कृषी व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार उभारण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळू शकते.

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणीनंतर कास्ट प्रमाणपत्र, चालू वर्षाचा नॉन-क्रिमीलेयर दाखला, दहावीची गुणपत्रिका, टी.सी., आधारकार्ड, पॅनकार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, फोटो व स्वाक्षरी आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
डॉ. शैलेश तायडे – ९७४९४७१३३१
प्रा. निलेश सदारे – ९५२७२०२१२६
प्रा. प्रवीण देवरे – ९८५०४८५६४४
प्रा. शरद पाटील – ९०२१७२६२१३
मोहन सूर्यवंशी – ९५०३२६९४४४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.