Contact Banner

सावद्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत भाईचाऱ्याचा संदेश; चांदणी चौकात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

 

savda-ganesh-visarjan-miravnuk-hindu-muslim-ekta-chandani-chowk

सावद्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत भाईचाऱ्याचा संदेश; चांदणी चौकात हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन


savda-ganesh-visarjan-miravnuk-hindu-muslim-ekta-chandani-chowk
 लेवा जगत मार्फत जाहिरात प्रसिद्धी 


लेवाजगत न्यूज सावदा : अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सावदा शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. दुपारी चार वाजता सुरू झालेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रात्री बारा वाजता विसर्जनाने संपन्न झाली. ढोल-ताशे, लेझीम व बॅन्जोच्या तालावर तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले.

दरम्यान, चांदणी चौकात हिंदू-मुस्लिम एकतेचे विलोभनीय दर्शन घडले. शेख निसार नबी व सावदा मुस्लिम समाजाच्या वतीने गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, नगरसेवक, माजी नगराध्यक्ष तसेच सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड व सावदा बीटचे उमेश पाटील यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. गणेश मंडळांचे स्वागत करून सामाजिक सलोखा व भाईचाऱ्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सावदा शहरात हिंदू-मुस्लिम समाजामध्ये कायमच भाईचारा, सलोखा आणि बंधुभावाची परंपरा राहिली असून, हीच एकतेची भावना यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला. चांदणी चौकातील या उपक्रमामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीला सामाजिक ऐक्याची विशेष जोड मिळाली.

हा विलोभनीय क्षण पाहण्यासाठी चांदणी चौकात हजारो गणेशभक्त तसेच मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. दोन्ही समाजातील नागरिकांनी परस्पर स्नेह व बंधुभावाचा संदेश देत या उपक्रमाचे स्वागत केले.

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीदरम्यान आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था सांभाळली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.