महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
लेवाजगत न्यूज सावदा, जि. जळगाव | २५ सप्टेंबर २०२६-
सावदा पोलीस ठाणे हद्दीत एका विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून हर्षल उर्फ दिगंबर सुनील सपकाळे मस्कावद याच्याविरुद्ध विनयभंगासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता संबंधित तरुण महिलेच्या घरी आला. त्यावेळी महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. महिलेने मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्यानंतर त्याने घरात प्रवेश करून तिचा हात पकडला व गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर संबंधित तरुण तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर महिलेने पती व नातेवाईकांसह सावदा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ व ३३३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत