Contact Banner

सावदा येथे महालय श्राद्ध

 

savda-mahalaya-shraddha-shri-swaminarayan-mandir-2026

सावदा येथे महालय श्राद्ध

savda-mahalaya-shraddha-shri-swaminarayan-mandir-2026
लेवाजगत मार्फत प्रसिद्धी 


लेवा जगत न्यूज सावदा : येथील श्री स्वामिनारायण मंदिरात वडताल निर्णयाप्रमाणे महालय श्राद्धाचे आयोजन करण्यात आले आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा अर्थात दि. २७ सप्टेंबर २०२६ पासून या धार्मिक उपक्रमास प्रारंभ होणार असून सर्वपित्री अमावस्या, दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी महालय श्राद्धाची सांगता होणार आहे.

पितरांच्या स्मरणार्थ व त्यांच्या आत्मशांतीसाठी महालय श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या कालावधीत आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या निमित्ताने श्राद्धविधी केला जातो. याच उद्देशाने श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा येथे भाविकांसाठी श्राद्धविधीची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या हरिभक्तांना मंदिरामध्ये श्राद्ध करावयाचे आहे, त्यांनी रु. ३५१/- अर्पण करून या धार्मिक विधीत सहभागी व्हावे, असे मंदिर प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

या आयोजनास प.पू. ध.धु. १००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज, प.पू. स.गु.शा.स्वा. श्री धर्मप्रसाददासजी आणि प.पू. स.गु.शा.स्वा. श्री भक्तिप्रकाशदासजी यांचे आशीर्वाद लाभले आहेत. को.शा. स्वामी श्री स्वयंप्रकाशदासजी हे या उपक्रमाचे योजक आहेत.

महालय श्राद्धास इच्छुक हरिभक्तांनी अधिक माहितीसाठी स्वामी सत्यप्रकाशदासजी (मो. ८६६८९६२२२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थळ : श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.