Contact Banner

सावद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे ५१ वे वर्ष श्री स्वामिनारायण मंदिरात २० ते २७ सप्टेंबरदरम्यान आयोजन; शास्त्री श्री भक्तिप्रियदासजी यांच्या वाणीतून होणार कथा निरूपण

 

savda-shrimad-bhagwat-katha-saptah-swaminarayan-mandir-20-27-september-2026

सावद्यात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे ५१ वे वर्ष

श्री स्वामिनारायण मंदिरात २० ते २७ सप्टेंबरदरम्यान आयोजन; शास्त्री श्री भक्तिप्रियदासजी यांच्या वाणीतून होणार कथा निरूपण

लेवाजगत न्यूज सावदा : श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा येथे परंपरेने आयोजित करण्यात येणाऱ्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे यंदा ५१ वे वर्ष आहे. यानिमित्ताने दि. २० ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्रीमद् भागवत कथा सप्ताह पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत कथा होणार असून, परिसरातील भाविकांसाठी हा भक्तिमय सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे.

शास्त्री श्री भक्तिप्रियदासजी यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथेचे निरूपण होणार आहे. भागवत श्रवणातून भक्ती, संस्कार आणि आध्यात्मिक चिंतनाचा संदेश भाविकांना मिळणार आहे.

या सप्ताहास प.पू. धु. १००८ आचार्यश्री राकेशप्रसादजी महाराज, प.पू. स.गु.शा.स्वा. श्री भक्तिप्रकाशदासजी आणि प.पू. स.गु.शा.स्वा. श्री धर्मप्रसाददासजी यांचे आशीर्वाद लाभणार आहेत.

कथेचे यजमान अ.नि. लक्ष्मण किसन नेमाडे यांच्या मोक्षार्थ गं.भा. रेखाबाई लक्ष्मण नेमाडे, सावदा हे आहेत. तर डॉ. अजितकुमार जयवंतराव पाटील हे कथेचे सहयजमान आहेत.

को.शा.स्वामी श्री स्वयंप्रकाशदासजी, समस्त सत्संग समाज व महिला मंडळ, सावदा यांच्या वतीने या ५१ व्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

५१ वर्षांची भक्तीमय परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या भागवत सप्ताहाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : श्री स्वामिनारायण मंदिर, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.