Contact Banner

श्री कामसिद्ध मंदिर, रोझोदा येथे महारुद्र सोहळ्याचे आयोजन

 

shri-kamsiddha-temple-rozoda-maharudra-rudra-abhishek-shravan-somvar-2026



श्री कामसिद्ध मंदिर, रोझोदा येथे महारुद्र सोहळ्याचे आयोजन

लेवाजगत रोझोदा, ता. रावेर : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, रोझोदा आणि श्रीराम मंदिर व श्री कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र जागृत कामसिद्ध मंदिर, रोझोदा येथे रुद्र अभिषेक सोहळा व संक्षिप्त श्रीमद् भागवत पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.

पवित्र श्रावण महिन्यातील चौथ्या श्रावण सोमवारी, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. भूपाळी आरतीनंतर संक्षिप्त श्री भागवत पारायण करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या सांगतेनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.






भगवान महादेवाला प्रिय असलेली सेवा म्हणून रुद्राध्यायाचे विशेष महत्त्व मानले जाते. रुद्राध्यायामध्ये ११ नमक व ११ चमक अध्यायांचा समावेश असून, भक्तिभावाने रुद्र पठण व अभिषेक केल्याने मनःशांती, आध्यात्मिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी संक्षिप्त श्री भागवत ग्रंथ, नित्यसेवा साहित्य, अभिषेक पात्र, ताम्हण, पाण्याची बाटली, पाट, १०८ बेलपत्र, आसन, चमचा, तांब्याचा तांबा, शिवलिंग, जपमाळ तसेच महामृत्युंजय यंत्र असल्यास ते सोबत आणावे.

पूजेसाठी हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, अत्तर, कापूर, सात नागकेशर, जानवे, शिवमूठ-जवस, पंचामृत, भस्म, नारळ आदी साहित्य आवश्यक आहे.

कार्यक्रमस्थळी महादेवाची पितळी नवीन पिंड, अभिषेक पात्र-लोटी, आसन, नागकेशर, भस्म, पारद शिवलिंग तसेच प्लास्टिक व धातूचे महामृत्युंजय यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉलची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पवित्र श्रावण महिन्यातील या धार्मिक सेवेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री स्वामी समर्थ महाराज व श्री कामसिद्ध महाराजांच्या चरणी सेवा रुजू करावी आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : श्रीक्षेत्र जागृत कामसिद्ध मंदिर, रोझोदा, ता. रावेर, जि. जळगाव
दिनांक : सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
वेळ : सकाळी ८ वाजता

#श्रीस्वामीसमर्थ #श्रीकामसिद्धमंदिर #महारुद्र #रुद्रअभिषेक #श्रावणसोमवार #श्रीभागवतपारायण #रोझोदा #रावेर #जळगाव #महाप्रसाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.