Contact Banner

श्री स्वामी समर्थ मुलांचे रुग्णालयाचा १२वा वर्धापन दिन; नवीन वास्तूत स्थलांतर व उद्घाटन सोहळा

 

shri-swami-samarth-childrens-hospital-12th-anniversary-new-premises-inauguration-savda

श्री स्वामी समर्थ मुलांचे रुग्णालयाचा १२वा वर्धापन दिन; नवीन वास्तूत स्थलांतर व उद्घाटन सोहळा






लेवाजगत न्यूज सावदा : आरोग्यसेवेच्या क्षेत्रात विश्वासाने १२ वर्षांचा प्रवास पूर्ण करणाऱ्या श्री स्वामी समर्थ मुलांचे रुग्णालयाचा १२वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने रुग्णालयाचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर व उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

रुग्णालयाच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांपासून बालरुग्णांना आरोग्यसेवा व काळजी देण्याचे कार्य सुरू आहे. नागरिकांचा प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद यामुळे आरोग्यसेवेचा हा प्रवास अधिक बळकट झाला असून, आता नवीन वास्तूतून रुग्णसेवेची नवी सुरुवात करण्यात येत आहे.

रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्थलांतर व उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास शास्त्री श्री भक्तीप्रियदासजी, स्वामीनारायण, मंदिर सावदा; ह.भ.प. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, आचार्य श्री मानेकर बाबा, महानुभाव मठ, सावदा; तसेच श्री कृष्णगिरी महाराज, सोमवारगीरी मढी, सावदा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हा कार्यक्रम सावदा बसस्टँड मागे, दत्त कॉलनी, टोकेनगर, सावदा, जि. जळगाव येथे होणार असून, नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या शुभप्रसंगी सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. प्रमिला व श्री. देविदास भोजू भंगाळे, सौ. राधिका व डॉ. स्वप्नील देविदास भंगाळे, कु. वेद स्वप्नील भंगाळे व कु. स्वरा स्वप्नील भंगाळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.