वधु-वर सूची २०२६ : विनामूल्य नाव नोंदणी सुरू
वधु-वर सूची २०२६ : विनामूल्य नाव नोंदणी सुरू
समता भ्रातृ मंडळ (पिंपरी-चिंचवड) व सर्व लेवापाटीदार मित्र मंडळांच्या वतीने विवाहेच्छू वधू-वरांसाठी वधु-वर सूची २०२६ तयार करण्यात येत आहे. या सूचीसाठी विनामूल्य नाव नोंदणी व पूर्णतः मोफत ऑनलाइन प्रवेश सुरू आहे.
नाव नोंदणी करण्यासाठी www.samatabhratrumandal.com या संकेतस्थळाला भेट देऊन ‘वधु वर मेळावा २०२६’ या पर्यायावर क्लिक करावे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाकडून रंगीत व बिनचूक वधु-वर सूची पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असून, त्यामध्ये सुमारे १,००० पेक्षा अधिक वधू-वरांची नावे असतात. हे पुस्तक मेळाव्याच्या सुमारे १० दिवस आधी अधिकृत नोंदणी व सूची विक्री केंद्रांवर उपलब्ध करून दिले जाते.
घरपोच सूचीची सुविधा
वधु-वर सूची २०२६ चे पुस्तक नागरिकांना Courier द्वारे घरपोच मागविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन आगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.
⚠️ महत्त्वाची सूचना
वधु-वर सूचीसाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जात नाही. ऑनलाइन सूची संगणकावर पाहण्याची सुविधाही पूर्णतः मोफत आहे.
तसेच, समता भ्रातृ मंडळाची सूची इतर कोणत्याही संकेतस्थळावर उपलब्ध नाही. मंडळाने कोणत्याही कार्यकर्त्याला सूचीचे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर, GPay, PhonePe किंवा अन्य कोणत्याही वैयक्तिक माध्यमातून स्वीकारण्याची परवानगी दिलेली नाही.
अशा प्रकारचा गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्वरित मंडळाशी संपर्क साधावा.
📞 Toll Free / संपर्क : ०२०-७११७३७३३
🌐 www.samatabhratrumandal.com
#वधुवरमेळावा२०२६ #वधुवरसूची #लेवापाटीदार #समताभ्रातृमंडळ #पिंपरीचिंचवड #लेवापाटीदारसमाज #विवाहेच्छू #विनामूल्यनोंदणी #वधुवरमेळावा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत