सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना विद्यार्थिनींकडून उजाळा; वर्षा पाटील महाविद्यालयात जयंती उत्साहात
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना विद्यार्थिनींकडून उजाळा; वर्षा पाटील महाविद्यालयात जयंती उत्साहात
जळगाव | प्रतिनिधी-
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, स्वातंत्र्यलढ्यातील महान नेते आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता शितलकुमार देशमुख यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्राचार्या प्रा. देशमुख यांनी आपल्या मनोगतातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान तसेच स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण करून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी केलेले ऐतिहासिक कार्य विद्यार्थिनींसमोर मांडले.
याप्रसंगी विद्यार्थिनींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. त्यांच्या देशभक्ती, दृढनिश्चय, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करत विद्यार्थिनींनी त्यांच्या विचारांना उजाळा दिला.
महापुरुषांचे विचार आणि कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यातून देशप्रेम, सामाजिक एकता आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत