Contact Banner

आमोदा तलाठी एक हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 

amoda-talathi-arrested-by-jalgaon-acb-while-accepting-rs-1000-bribe

आमोदा तलाठी एक हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


amoda-talathi-arrested-by-jalgaon-acb-while-accepting-rs-1000-bribe


लेवाजगत न्यूज फैजपूर : यावल तालुक्यातील आमोदा येथील तलाठ्याला सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार शेतकरी असून त्यांच्या सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद करण्याच्या कामासाठी आमोदा येथील तलाठी शैलेश झोटे यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार जळगाव एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

मंगळवारी ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन आमोदा ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या तलाठी कार्यालयाजवळ पोहोचले. यावेळी तलाठी शैलेश झोटे यांनी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाला इशारा देण्यात आला. त्यानंतर पथकाने तलाठी झोटे यांना ताब्यात घेतले.

जळगाव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.