Contact Banner

सावदा व अंबऋषी येथील सोमवारगिरी मढीचे गादीपती महंत कृष्णगिरी बाबाजी यांच्या मातोश्रींचे निधन

savda-amb-rushi-somvargiri-madhi-gadipati-mahant-krishnagiri-babaji-matoshri-bhimabai-bhavr-death

सावदा व अंबऋषी येथील सोमवारगिरी मढीचे गादीपती महंत कृष्णगिरी बाबाजी यांच्या मातोश्रींचे निधन

savda-amb-rushi-somvargiri-madhi-gadipati-mahant-krishnagiri-babaji-matoshri-bhimabai-bhavr-death

लेवाजगत न्यूज सावदा, दि. ६ ऑक्टोबर : सावदा तसेच अंबऋषी येथील सोमवारगिरी मढीचे गादीपती परमपूजनीय महंत कृष्णगिरी बाबाजी यांच्या मातोश्री ग. भा. भीमाबाई बापुराव भवऱ (आईसाहेब) यांचे मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी एकादशी पर्वदिनी पहाटे देवाज्ञा झाली.

भीमाबाई भवऱ यांच्या निधनाची वार्ता समजताच परिवार, शिष्यपरिवार तसेच स्वामीभक्त व भाविकांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर लोहगाव, ता. पैठण येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात परिवार, नातेवाईक, शिष्यपरिवार व मोठा भक्तपरिवार असा परिवार आहे. सावदा परिसरातील भाविकांसह आप्तेष्ट व शिष्यांनी आईसाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.