Contact Banner

भुलाबाई महोत्सवात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

 

bhulabai-mahotsav-2026-dr-ulhas-patil-english-medium-school-students-secured-second-place

भुलाबाई महोत्सवात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश


bhulabai-mahotsav-2026-dr-ulhas-patil-english-medium-school-students-secured-second-place


लेवाजगत न्यूज सावदा : केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी यांच्या वतीने आयोजित ‘भुलाबाई महोत्सव २०२६’ अंतर्गत जळगाव येथे झालेल्या ग्रामीण जिल्हास्तरीय स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थिनींनी पारंपरिक भुलाबाई गीत, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणातून आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडविले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींची तयारी करून घेण्यासाठी शिक्षिका वैशाली चौधरी, मंगला कांबळे, वर्षा नेहते व जयश्री तायडे, संगीत शिक्षिका कांचन अहिर आणि हर्षल पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले. पेटीची साथ विद्यार्थी ऋषिकेश महाजन याने दिली.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांनी विद्यार्थिनी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्गाने विद्यार्थिनींचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.