Contact Banner

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला ४१ लाखांचा गंडा

 

shirpur-madhya-pradesh-head-constable-ravi-kanose-death-selfie-before-death

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेला ४१ लाखांचा गंडा

लेवाजगत न्यूज पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका महिलेला तब्बल ४१ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

shirpur-madhya-pradesh-head-constable-ravi-kanose-death-selfie-before-death



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत संदेश पाठवून विश्वासात घेतले. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, त्यानंतर महिलेकडून वेगवेगळ्या कारणांनी मोठ्या रकमा जमा करून घेण्यात आल्या.

सुमारे १५ ते २० दिवसांत महिलेने ४१ लाख रुपये ऑनलाइन जमा केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, ऑनलाइन शेअर बाजार गुंतवणुकीच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या संदेशांवर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.