Contact Banner

चिनावल येथील २७ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू चेहऱ्यावर उजव्या डोळ्याजवळ ६ मिमीचे छिद्र; सावदा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित

 

chinawal-27-year-old-youth-dies-under-suspicious-circumstances

चिनावल येथील २७ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

चेहऱ्यावर उजव्या डोळ्याजवळ ६ मिमीचे छिद्र; सावदा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मृत घोषित

chinawal-27-year-old-youth-dies-under-suspicious-circumstances



सावदा, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : चिनावल (ता. रावेर) येथील २७ वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. निर्मल युवराज महाजन (वय २७, रा. चिनावल) असे मयत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल महाजन याच्या चेहऱ्यावर उजव्या डोळ्याजवळ गोलाकार सुमारे ६ मिमी आकाराचे छिद्र पडलेल्या अवस्थेत त्याचे नातेवाईक त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सावदा येथे घेऊन आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी सावदा पोलिसांना लेखी मेमोद्वारे दिली. त्यावरून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अमृ क्र. २२/२०२६) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

घटना नेमकी कशी घडली, तसेच तरुणाच्या चेहऱ्यावर झालेली दुखापत कशामुळे झाली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.