Contact Banner

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत वर्चस्व

 

dhanaji-nana-junior-college-dominates-taluka-level-athletics-competition

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत वर्चस्व


dhanaji-nana-junior-college-dominates-taluka-level-athletics-competition


लेवाजगत न्यूज फैजपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा नुकत्याच जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, फैजपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत वर्चस्व गाजविले.

या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लांबउडी, थाळीफेक, गोळाफेक, १०० मीटर, ४०० मीटर, १५०० मीटर, ३००० मीटर धावणे तसेच चालण्याच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

१७ वर्षे वयोगटात धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाच्या रोहन अनिल कोळी याने ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. प्रशांत दिलीप कोळी याने ५ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर लांबउडीमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.

१९ वर्षे वयोगटात जयेश ईश्वर महाजन याने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. पूर्वेश विश्वनाथ पाटील याने गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पूर्वेश सुरेश तायडे याने १५०० मीटर व ३००० मीटर धावण्याच्या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष शिरीषदादा मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष डॉ. एस. के. चौधरी तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रा. दिलीप बोदडे व प्रा. पूनम कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.