Contact Banner

चोपडा येथील रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद १९९ उमेदवारांच्या मुलाखती; १२९ उमेदवारांची प्राथमिक निवड, २० जणांची अंतिम निवड

 

chopda-rojgar-melavyala-utsphurt-pratisad-129-umedvaranchi-prathamik-nivad

चोपडा येथील रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

१९९ उमेदवारांच्या मुलाखती; १२९ उमेदवारांची प्राथमिक निवड, २० जणांची अंतिम निवड


chopda-rojgar-melavyala-utsphurt-pratisad-129-umedvaranchi-prathamik-nivad


लेवाजगत चोपडा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि डॉ. केतकी पाटील फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रोजगार महाकुंभ’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा चोपडा तहसील कार्यालयाच्या सभागृहात मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन उद्घाटनानंतर मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार भाऊसाहेब थोरात होते. प्रमुख उपस्थितांमध्ये नायब तहसीलदार, चोपडा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय वाणी, भाजपा जळगाव जिल्हा महामंत्री राकेशदादा पाटील, भाजपा चोपडा शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक नरेंद्र पाटील, भाजपा मंडळाध्यक्ष पिंटूभाऊ पावरा, कांतीलालजी पाटील, मुरलीभाई गुजराती यांच्यासह भाजपाचे नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश वाणी यांनी केले. त्यांनी डॉ. केतकी पाटील फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच रोजगार महाकुंभ अंतर्गत विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती दिली. चोपडा येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यामागील उद्देशही त्यांनी स्पष्ट केला.

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिंदे सर यांनी केले.

या रोजगार मेळाव्यात ९ उद्योजक सहभागी झाले होते. एकूण १९९ उमेदवारांनी मुलाखती दिल्या, त्यात ४४ महिला आणि १५५ पुरुषांचा समावेश होता. मुलाखतीनंतर १२९ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. यामध्ये २८ महिला आणि १०१ पुरुषांचा समावेश आहे. त्यापैकी २० उमेदवारांची अंतिम निवड झाली असून, त्यात ५ महिला आणि १५ पुरुषांचा समावेश आहे.

चोपडा येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.