Contact Banner

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सरदार पटेल यांना अभिवादन

 

dr-ulhas-patil-medical-college-sardar-vallabhbhai-patel-jayanti

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सरदार पटेल यांना अभिवादन



जळगाव | प्रतिनिधी-

येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिनानिमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सरदार पटेल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान नेते आणि देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री होते. स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थानांचे एकत्रीकरण करून अखंड आणि एकसंध भारताच्या निर्मितीत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या दूरदृष्टी, कणखर नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेमुळे त्यांना 'लोहपुरुष' म्हणून ओळखले जाते. आजचा एकसंध भारत हा त्यांच्या महान कार्याचा आणि योगदानाचा गौरवशाली वारसा आहे.

राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचे स्मरण करून देशाची एकता, अखंडता आणि बंधुता जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.