गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात; राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात; राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश
जळगाव | प्रतिनिधी-
गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य विशाखा गणवीर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्या महान कार्याचे स्मरण करत देशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय ऐक्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती उपस्थितांना दिली.
भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने योगदान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एकात्मता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना समाजात रुजविण्याचे आवाहनही करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आणि कार्य आजच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या आदर्शांनुसार एकसंघ, सक्षम आणि समर्थ भारत घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत