डॉ.वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; गोदावरी परिवारात वाढदिवस उत्साहात साजरा सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-नृत्य सादरीकरण आणि अभिष्टचिंतन सोहळ्याने वाढदिवसाला रंगत
डॉ.वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; गोदावरी परिवारात वाढदिवस उत्साहात साजरा
सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-नृत्य सादरीकरण आणि अभिष्टचिंतन सोहळ्याने वाढदिवसाला रंगत
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी परिवाराच्या वतीने विविध सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच महादेव रुग्णालय येथे त्यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आगमन झाल्यानंतर डॉ. वर्षा पाटील यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. केतकी पाटील सभागृहात वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी गोदावरी परिवारातील सदस्यांसह विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले. गोदावरी फाउंडेशनच्या उभारणीत डॉ. वर्षा पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रत्येक निर्णयात डॉ. वर्षा पाटील यांनी खंबीरपणे साथ दिली आहे. सून, पत्नी, आई, सासू आणि आजी अशा विविध भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या डॉ. वर्षा पाटील या सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गोदावरी आजींच्या अनुपस्थितीत साजरा होणारा हा पहिला वाढदिवस असला, तरी त्यांचे आशीर्वाद कायम लाभत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यानंतर गोदावरी फाउंडेशन संचलित विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बीएचएम, एमबीबीएस, आयुर्वेद, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि होमिओपॅथी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, समूह नृत्य आणि गीतांच्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. याशिवाय रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रा. डॉ. पियूष वाघ, डॉ. विद्यानंद आठवले आणि डॉ. धनंजय बोरोले यांनी एकल गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनअंतर्गत कार्यरत सर्व शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य आणि प्रमुखांनी डॉ. वर्षा पाटील यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. वर्षा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाषदादा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. सौरभ पाटील, संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. जयवंत नागूलकर, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य शिवानंद बिरादर, वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, मुख्य लेखापाल योगेश पाटील, डॉ. सी. डी. सारंग, डॉ. दिलीप ढेकळे, अकॅडमिक डीन डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. सुभाष बडगुजर, डॉ. मुकेश पाटील, चेतन चौधरी आणि रजिस्ट्रार राहुल गिरी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची मोराळे आणि उत्कर्ष भोसले यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभारही मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत