Contact Banner

डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट एमसीबी, ईव्ही चार्जर्ससह विविध उत्पादन प्रक्रियांची घेतली प्रत्यक्ष माहिती

 

dr-varsha-patil-womens-college-godavari-technodia-industrial-visit

डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजच्या विद्यार्थिनींची गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजला औद्योगिक भेट

एमसीबी, ईव्ही चार्जर्ससह विविध उत्पादन प्रक्रियांची घेतली प्रत्यक्ष माहिती

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, जळगाव येथील विद्यार्थिनींसाठी गोदावरी इंडस्ट्रीज आणि टेक्नोडिया इंडस्ट्रीज येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींना वर्गात मिळालेल्या सैद्धांतिक ज्ञानाची प्रत्यक्ष औद्योगिक कामकाजाशी सांगड घालता यावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि औद्योगिक क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची ओळख व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.


dr-varsha-patil-womens-college-godavari-technodia-industrial-visit


या भेटीदरम्यान विद्यार्थिनींनी विविध उत्पादन प्रक्रियांची प्रत्यक्ष पाहणी केली. गोदावरी इंडस्ट्रीजमध्ये इलेक्ट्रिकल मिनिएचर सर्किट ब्रेकर (एमसीबी) निर्मिती, विविध घटकांचे उत्पादन, असेंब्ली आणि वेल्डिंग प्रक्रियेची माहिती त्यांना देण्यात आली. तसेच पिव्होट पिन असेंब्ली, थर्मल लाईन आणि मॅग्नेटिक लाईनवरील घटकांच्या निर्मिती प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देताना विद्यार्थिनींनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) वापरण्यात येणाऱ्या चार्जर्सच्या उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच चारचाकी वाहनांसाठी तयार करण्यात येणाऱ्या एसी ते डीसी चार्जर्सच्या निर्मिती प्रक्रियेचीही प्रत्यक्ष माहिती त्यांना देण्यात आली. उत्पादन प्रक्रियेचे निरीक्षण करताना विद्यार्थिनींना औद्योगिक क्षेत्रातील तांत्रिक बाबी, यंत्रसामग्रीचा वापर आणि कामकाजाच्या पद्धती समजून घेण्याची संधी मिळाली.

यावेळी गोदावरी व टेक्नोडिया इंडस्ट्रीजचे प्लांट डायरेक्टर श्री. चेतन नारखेडे, प्लांट हेड श्री. प्रवीण येवले आणि सुपरवायझर श्री. हर्षल सोनवणे यांनी विद्यार्थिनींना विविध उत्पादन प्रक्रिया व तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करून त्यांना औद्योगिक क्षेत्रातील कामकाजाविषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

या औद्योगिक भेटीचे आयोजन महाविद्यालयाच्या इंडस्ट्रियल इंटरॅक्शन अँड व्हिजिट कमिटीच्या समन्वयक प्रा. मानसी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाचा अनुभव मिळाला असून, त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात आणि तांत्रिक समजुतीत भर पडली आहे. अशा औद्योगिक भेटींमुळे विद्यार्थिनींना अभ्यासक्रमातील संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास तसेच भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.