Contact Banner

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

 

godavari-imr-handwashing-awareness-program-at-manyarkheda-school

मण्यारखेडा शाळेत गोदावरी आयएमआरतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

जळगाव : जागतिक हात धुणे दिनानिमित्त गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे मण्यारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविणे आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाला माजी सरपंच राजूदादा, ग्रामसेविका आणि शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी एनएसएस स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. हात योग्य पद्धतीने कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच हात अस्वच्छ झाल्यावर साबणाने हात धुणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. नियमितपणे योग्य पद्धतीने हात धुतल्याने अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य संवर्धन आणि स्वच्छतेच्या सवयींबाबत जागरूकता निर्माण झाली.

उपक्रमाच्या यशस्वितेसाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता चौधरी, क्रीडा संचालक प्रा. चंद्रकांत डोंगरे, एनएसएस सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपक दांडगे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.