Contact Banner

गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विविध महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन

 

godavari-foundation-sardar-vallabhbhai-patel-jayanti-national-unity-day-jalgaon

गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विविध महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन


godavari-foundation-sardar-vallabhbhai-patel-jayanti-national-unity-day-jalgaon


जळगाव | प्रतिनिधी-

गोदावरी फाउंडेशन संचालित विविध शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांमध्ये भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यार्थी विभागप्रमुख अनंत इंगळे, भूषण चौधरी, पंकज राणे, मिलिंद पाटील, नरेंद्र नारखेडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उल्हास पाटील यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. स्वातंत्र्यसैनिक, देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या एकीकरणात ऐतिहासिक योगदान दिले. देशातील विविध संस्थानांचे विलीनीकरण करून त्यांनी एकसंध आणि मजबूत भारताच्या निर्मितीचा पाया घातला. आजचा भारत हा त्यांच्या दूरदृष्टीचा, कणखर नेतृत्वाचा आणि अदम्य राष्ट्रनिष्ठेचा परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय

येथील महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नयना झोपे यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदीप महाजन, प्रा. अमोल चौधरी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर

या संस्थेत भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी सरदार पटेल यांच्या महान कार्याची तसेच भारताच्या एकीकरणातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

गोदावरी फाउंडेशनच्या अन्य संस्थांमध्येही अभिवादन

याचबरोबर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर, डॉ. वर्षा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल सावदा व भुसावळ, डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर, कृषी अभियांत्रिकी तसेच अन्न व तंत्रज्ञान विभागातही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले.

या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, देशप्रेम आणि अखंडतेची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.