Contact Banner

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ‘फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६’ उत्साहात संपन्न! रोशनी सरोदे ठरली मिस फ्रेशर, तर प्रितेश ठाकूर याने पटकावला मिस्टर फ्रेशरचा बहुमान

 

godavari-imr-freshers-spotlight-2k26-jalgaon

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ‘फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६’ उत्साहात संपन्न!




रोशनी सरोदे ठरली मिस फ्रेशर, तर प्रितेश ठाकूर याने पटकावला मिस्टर फ्रेशरचा बहुमान

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव येथे बीसीए, एमबीए, एचएचएम आणि एमसीए विभागातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६’ हा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून नवागत विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची आणि महाविद्यालयीन जीवनाची नव्या उत्साहाने सुरुवात करण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत वारके यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रातील विविध संधी, करिअरचे नियोजन आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. उच्च शिक्षणाच्या नव्या प्रवासात विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवागत विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर्स स्पॉटलाईट’ ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत परिचय (इंट्रोडक्शन), वादविवाद (डिबेट), टंग ट्विस्टर आणि परीक्षकांचे प्रश्न अशा चार फेऱ्यांचा समावेश होता. एकूण १०० गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले.

यासोबतच विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि रॅप सादरीकरण अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या स्पर्धेत रोशनी सरोदे हिने ‘मिस फ्रेशर’, तर प्रितेश ठाकूर याने ‘मिस्टर फ्रेशर’ हा बहुमान पटकावला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन देवयानी महाजन हिने केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन, बक्षीस वितरण आणि भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. त्यानंतर आयोजित डी.जे. डान्स पार्टीने कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.