Contact Banner

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती जागतिक हात धुणे दिनानिमित्त स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गरजू कुटुंबांना स्वच्छता साहित्याचे वाटप

 

rotaract-club-of-godavari-elite-handwashing-awareness-campaign-jalgaon

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

जागतिक हात धुणे दिनानिमित्त स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गरजू कुटुंबांना स्वच्छता साहित्याचे वाटप

जळगाव : जागतिक हात धुणे दिनाचे औचित्य साधून रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिट, जळगाव यांच्या वतीने एमआयडीसी परिसरातील पंढरपूर नगर, विणूज वर्ल्डजवळील काठियावाडी भागात हात धुण्याबाबत जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे परिसरातील गरजू व वंचित कुटुंबांमध्ये वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या मोहिमेदरम्यान परिसरातील नागरिकांना आणि बालकांना हात धुण्याची योग्य पद्धत, दैनंदिन स्वच्छतेचे महत्त्व तसेच निरोगी जीवनशैलीसाठी स्वच्छतेच्या सवयींची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावल्यास अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते, याची माहिती नागरिकांना देण्यात आली.

नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजाव्यात आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढावी, या उद्देशाने मोहिमेदरम्यान गरजू कुटुंबांना जीवनावश्यक स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात आले.

समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला. स्वच्छतेच्या साध्या सवयींच्या माध्यमातून निरोगी समाज घडविण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.