सावदा येथे विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रावेर तालुक्याच्या वतीने मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सावदा येथे विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचे आयोजन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रावेर तालुक्याच्या वतीने मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
सावदा, लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रावेर तालुका व सावदा नगर यांच्या वतीने विजयादशमी उत्सव व पथसंचलनाचे आयोजन मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्वामी हॉस्पिटल, सावदा येथील डॉ. अविनाश रामचंद्र बऱ्हाटे (एम.डी. डी.जी.ओ.) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून भुसावळ जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख श्री. अमोलजी खलसे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रावेर तालुका संघचालक अॅड. श्री. भास्कर दिगंबर निळे यांची उपस्थिती राहणार आहे.
मंगळवारी सकाळी ७ वाजता एकत्रीकरण, सकाळी ८ वाजता पथसंचलन, तर सकाळी ९ वाजता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय, दुर्गामाता मंदिरासमोर, सावदा येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघाच्या स्वयंसेवकांकडून तयारी करण्यात येत आहे.
पथसंचलनात गणवेशधारी स्वयंसेवक सहभागी होणार असून, उत्सवात सर्व हिंदू समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. उत्सवात महिलांच्या सहभागासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत