शिरपूरमध्ये मध्यप्रदेशातील हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू; आत्महत्येपूर्वी सेल्फी पाठवल्याची माहिती
शिरपूरमध्ये मध्यप्रदेशातील हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू; आत्महत्येपूर्वी सेल्फी पाठवल्याची माहिती
वृतसंस्था शिरपूर : शिरपूर तालुक्यातील लालमाती येथील शिवरात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख मध्यप्रदेश पोलिस दलातील हेडकॉन्स्टेबल रवी कनौसे (वय 34) अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी कनौसे हे मध्यप्रदेश पोलिस दलात कार्यरत होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नीला सेल्फी फोटो पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
कनौसे हे शिरपूर पोलिसांच्या शासकीय वसाहतीत राहत होते. 2 ऑक्टोबर रोजी रात्रीपासून ते बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, लालमाती परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आत्महत्येपूर्वी काय घडले?
रवी कनौसे यांनी आत्महत्येपूर्वी पत्नीला सेल्फी पाठविल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांकडून तसेच संबंधितांकडून माहिती घेतली जात आहे. शवविच्छेदन व पुढील तपासानंतर घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत