Contact Banner

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू वरणगाव पोलिसांत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल

 

truck-bike-accident-varangaon-two-dead-truck-driver-booked

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू

वरणगाव पोलिसांत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल

लेवाजगत न्यूज वरणगाव : भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर बोहर्डी गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


truck-bike-accident-varangaon-two-dead-truck-driver-booked


मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुजरात पासिंगचा ट्रक बोहर्डी गावाजवळील निर्मल साई हॉटेलसमोर महामार्गावर उभा होता. यावेळी मागील बाजूने येणाऱ्या वाहनांची योग्य ती काळजी न घेता ट्रक उभा केल्याने दुचाकीने ट्रकला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील विकास विष्णू पवार (वय ४५) आणि सोनाजी रामचंद्र फरकडे (वय ४२, रा. निंबेडी बुद्रुक, ता. मुक्ताईनगर) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

अपघातास ट्रकचालक जबाबदार असल्याचा आरोप करत तक्रारदाराने वरणगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी ट्रकचालक लखधीर नारायणभाई केडरिया (रा. जामनगर, गुजरात) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरणगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.