डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये पंडित नेहरू जयंती उत्साहात साजरी
शिक्षणातून समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा नेहरूंचा विचार विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविला
लेवाजगत न्यूज जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी नेहरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी प्रा. आरती वर्मा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती दिली. मुलांप्रती असलेले त्यांचे प्रेम, शिक्षणाविषयीची दूरदृष्टी आणि आधुनिक भारताच्या उभारणीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न यावर त्यांनी प्रकाश टाकला. शिक्षण हेच समृद्ध, सक्षम आणि प्रगत राष्ट्र घडविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचा नेहरूंचा विचार आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच बालदिनाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थिनींनी नेहरू यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधावी आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. शिवानी महाजन यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत