Contact Banner

गोदावरी अभियांत्रिकीत ‘नेक्सस २के२६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात गौरव भोई ठरला मिस्टर फ्रेशर, तर कुमुदिनी महाजन हिने पटकावला मिस फ्रेशरचा किताब

 

godavari-engineering-college-nexus-2k26-freshers-party

गोदावरी अभियांत्रिकीत ‘नेक्सस २के२६’ फ्रेशर्स सोहळा उत्साहात

गौरव भोई ठरला मिस्टर फ्रेशर, तर कुमुदिनी महाजन हिने पटकावला मिस फ्रेशरचा किताब


godavari-engineering-college-nexus-2k26-freshers-party


जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘नेक्सस २के२६’ हा फ्रेशर्स सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात संगणक अभियांत्रिकी विभागाचा गौरव भोई याची ‘मिस्टर फ्रेशर’, तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची कुमुदिनी महाजन हिची ‘मिस फ्रेशर’ म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी फाउंडेशनचे सदस्य व प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, प्रमुख पाहुणे तथा जळगाव आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २०१४ बॅचचे माजी विद्यार्थी निलेश पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिष्ठाता, प्राध्यापकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासासोबतच सांस्कृतिक आणि विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख पाहुणे निलेश पाटील यांनी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या काळातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रथम व द्वितीय वर्षात योग्य निर्णय घेणे, सातत्याने कौशल्यविकास करणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि विविध छंद जोपासणे या बाबींचे महत्त्व त्यांनी विशद केले.

डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात सॉफ्ट स्किल्स आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी महाविद्यालय सदैव त्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

यानंतर फ्रेशर्स पार्टीच्या मनोरंजनात्मक सत्राला सुरुवात झाली. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सादरीकरणांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव इंगळे, जिज्ञासा पाटील, संकेत बागड, सोनम गुंजाळ, मोहित चौधरी, रिद्धी भिरूड, राजश्री यादव, लल्लेश पाटील, निखिल पाटील, प्रणाली पाटील, ऋषिकेश पाटील, स्नेहल पाटील, हितेश चौधरी, मोहिनी जोशी, दिया चौधरी, चेतन चौधरी आणि आदेश जैस्वाल यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापकवर्गाने विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील आणि डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.