जळगाव येथील जनार्दन खुशाल चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
जळगाव येथील जनार्दन खुशाल चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज जळगाव : येथील नूतन वर्षा कॉलनीतील रहिवासी जनार्दन खुशाल चौधरी (वय ८६) यांचे रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
ते गुंजन मल्टिपर्पज हॉलचे संचालक व सायकलिस्ट निलेश जनार्दन चौधरी यांचे वडील, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद कोल्हे यांचे सासरे तसेच बालरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा कोल्हे यांचे वडील होते.
त्यांची अंत्ययात्रा रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी नूतन वर्षा कॉलनी येथील प्लॉट क्रमांक ७-अ या राहत्या घरापासून निघणार असून, नेरी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाने चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि चौधरी परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत