Contact Banner

सिंगनूर येथे २८ नोव्हेंबरपासून श्रीमद् भागवत कथा व हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 

singnur-shrimad-bhagwat-katha-harinam-saptah-2026

सिंगनूर येथे २८ नोव्हेंबरपासून श्रीमद् भागवत कथा व हरिनाम सप्ताहाचे आयोजन

सिंगनूर (ता. रावेर, प्रतिनिधी हेमंत चांदवे) : सिंगनूर येथे भक्तिमय वातावरणात श्रीमद् भागवत कथा व हरिनाम सप्ताहाचे आयोजन दि. २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या सप्ताहात कथा वाचनासाठी वाणीभूषण ह.भ.प. समाधान महाराज रेंभोटेकर यांची उपस्थिती लाभणार आहे.

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ वाजेपर्यंत काकडा, सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तन होणार आहे.

कीर्तनकारांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

  • २८ नोव्हेंबर – ह.भ.प. नारायण महाराज, निंभोरा
  • २९ नोव्हेंबर – बाल कीर्तनकार डिंपल दीदी, आळंदी
  • ३० नोव्हेंबर – मदन महाराज, मेहुण
  • १ डिसेंबर – सूर्यभान महाराज, शेळगाव
  • २ डिसेंबर – तेजस महाराज, वडगाव
  • ३ डिसेंबर – दीपक महाराज, चांदसणीकर
  • ४ डिसेंबर – तुषार महाराज, काटेलधाम

दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ह.भ.प. समाधान महाराज रेंभोटेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सप्ताहात गायनाचार्य निलेश महाराज खांडवी, दीपक महाराज पाळशी सुपो यांची साथ लाभणार असून मृदंगवादक म्हणून गणेश महाराज रेंभोटेकर सेवा बजावणार आहेत.

काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी भव्य दिंडी सोहळा पार पडणार आहे.

या दिंडी सोहळ्यात सिंगनूर, दसनूर, बलवाडी, तांदलवाडी, हतनूर, मुंजलवाडी, निंभोरा, मस्कावद, खिर्डी, वाघोदा, सिंगत, धामोडी, आंदलवाडी, चिनावल, रेंभोटा, वाघाडी, निंबोल, ऐनपूर, सिंगाडी, भामलवाडी, पुरी, गोलवाडा, अहिरवाडी आदी गावांतील भजनी मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ सिंगनूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा व दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.