केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा आजपासून तीन दिवसीय जळगाव जिल्हा दौरा मुक्ताईनगर येथे मुक्काम; कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि स्थानिक बैठकींना देणार वेळ
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा आजपासून तीन दिवसीय जळगाव जिल्हा दौरा
मुक्ताईनगर येथे मुक्काम; कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि स्थानिक बैठकींना देणार वेळ
जळगाव प्रतिनिधी : केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे या रविवार, दि. २२ नोव्हेंबरपासून तीन दिवसांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील राजशिष्टाचार कक्षामार्फत त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रविवारी सकाळी ७.४० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून त्या रस्तेमार्गे रवाना होतील. सकाळी ११.४० वाजता त्यांचे मुक्ताईनगर येथे आगमन होणार आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत स्थानिक कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका होणार असून, त्यानंतर त्यांचा मुक्काम मुक्ताईनगर येथे असेल.
सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत स्थानिक भेटीगाठी व कार्यकर्त्यांसोबत बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. दुपारी २ ते ३ हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. रात्री त्या मुक्ताईनगर येथे मुक्कामी राहणार आहेत.
मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजीही सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत स्थानिक कार्यक्रम व कार्यकर्त्यांच्या बैठका होणार आहेत. या दिवशीही दुपारी २ ते ३ हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
या दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या मुक्ताईनगर परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, स्थानिक स्तरावरील विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. दौऱ्यादरम्यान त्यांच्यासमवेत केंद्रीय राज्यमंत्री महोदयांचे समवेत श्री. अतुल महाजन, तसेच अंगरक्षक मो. क्र. ९६५३४४२३७१ हे उपस्थित राहणार असल्याचे दौरा कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.
स्रोत : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव – राजशिष्टाचार कक्ष, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत