वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; विलेपार्ले गुरूस्थान लोकसेवा मंडळाचा सेवाभावी उपक्रम
वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; विलेपार्ले गुरूस्थान लोकसेवा मंडळाचा सेवाभावी उपक्रम
कल्याण (गुरुदत्त वाकदेकर) : विलेपार्ले गुरूस्थान लोकसेवा मंडळाच्या सदस्यांनी आज कल्याणमधील खडवली परिसरातील वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील आजी-आजोबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
भेटीदरम्यान सदस्यांनी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत काही आनंदाचे क्षण घालवले.
आजी-आजोबांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन त्यांना खोबरेल तेल, कंगवे, टूथपेस्ट, टूथब्रश, साबण आणि प्रौढांसाठीचे डायपर्स देण्यात आले. तसेच कडधान्य, गहू आणि तांदूळही वितरित करण्यात आले.
आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद हीच मंडळाच्या सदस्यांसाठी या उपक्रमाची सर्वांत मोठी कमाई ठरली.
"दुजियाचे हित चिंतावे, होईल तितके भले करावे, यथानुशक्ती धर्म आचरावे, तरीच मिळावे साईपाय!" या उक्तीतील विचार कृतीत उतरवत मंडळाने सेवाभाव जपला. माणुसकी जपण्यातच खरे समाधान आणि सेवेतच खरा आनंद आहे, हा अनुभव या भेटीतून मिळाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत